जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्याने दीपकेंच्या घरी जल्लोष

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्याने सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके त्यांच्या वाळूज येथील घरी जल्लोष करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, आई-वडील म्हणून आम्हाला अभिजीतची सतत काळजी होती. त्याला प्रचंड विरोध झाला. मात्र, माझ्या मुलाने मोठे काम करून दाखवले. हा त्याचा एकट्याचा विजय नाही तर सर्व विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आहे. आज आमच्या डोळ्यातील अश्रू हे काळजीचे नाहीत तर हे आनंदाश्रू असल्याची प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी दिली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूज येथील घरी आनंदोत्सव साजरा
समर्थकांनी करण्यात आला. फटाके फोडून जल्लोष केला, तर परिसरात मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अभिजीत दीपके यांच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपके यांच्या आई अनिता दीपके म्हणाल्या, आज मला खूप आनंद झाला आहे. या आंदोलनात अभिजीतला चापट खावी लागली. त्याच्यावर शाई फेकण्यात आली. नको तिथे त्याला झोपावे लागले. हे पाहून आमच्या डोळ्यात अश्रू येत होते. मात्र आज त्याचा खूप मोठा विजय झाला आहे. त्याला टायफॉईड झाला तरी तो मागे हटला नाही. या सर्वातून त्याने हा विजय मिळवला असल्याचेही त्या म्हणाल्या.
मनावरचे ओझे झाले कमी
तो घरी आला की त्याला मिठी मारून त्याला ओवाळणार. आमच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. मात्र तो त्याच्या उद्देशावर ठाम होता. ६ जूनपासून तो बोस्टनहून भारतात आला तेव्हापासून त्याला झोप नाही. त्याला सतत त्याचे ध्येय दिसत होते. विद्यार्थ्यांच्या अडचणी दिसत होत्या. मात्र आज त्याच्या मनावरील ओझे कमी झाले आहे त्याच्या कष्टाचे चीज झाले. आम्हालाही याचा खूप मोठा आनंद झाला आहे. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा हा विजय झाला असल्याचे दीपके यांचे वडील म्हणाले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions